एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार नसल्याने आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त हाेत आहे. दरम्यान, या संदर्भात जामनेर आगारात कर्मचाऱ्यांनी ‘दाम नही ताे काम नही’ आंदोलन करत राज्य सरकार विरोधात आक्रोश केला.

कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देणे हे कायद्याने बंधनकारक आहे, यासंदर्भात औद्योगिक न्यायालयाने आदेश दिले आहेत, असे असतानाही महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून त्या आदेशाची पायमल्ली होत आहे. या बाबींचा निषेध करण्यासाठी एस. टी. कामगार संघटनांनी एकत्र येऊन जामनेर बसस्थानकात राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी किशोर पाटील, कृष्णा नानोटे, दादाराव थाटे, प्रवीण सपकाळ, अनिल जैन, निवृत्ती श्रीखंडे, संजू निकम, डी.एस. नाईक, विजय लहासे, जितू मुळे, आर.डी. पाटील, एस.एन. तांबोळी, नितीन सोनवणे, कैलास चौधरी, दिनेश नेटके, नाना सातवे उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज