fbpx

नवी मुंबई येथील विमानतळाच्या नामांतरावरून सावदा येथे संविधान आर्मीतर्फे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ ।  नवी मुंबई येथील विमानतळास नाव देण्यावरुन विविध राजकीय पक्षाच्या मागण्या मुळे पेज निर्माण झाला असल्याने त्या ऐवजी सदर विमानतळास “संविधान” असे नाव द्यावे या मागणीसाठी सावदा रेल्वे स्टेशन येथे संविधान आर्मीतर्फे 29 रोजी अंदोलन करण्यात आले व स्टेशन प्रबंधक सावदा यांना निवेदन देण्यात आले.तसेच सावदा पोलीस स्टेशन येथे स.पो.नी, देवीदास इंगोले यांना देखील निवेदन देण्यात आले.

संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाऊ सोनवणे, यांचे उपस्थितीत हे आंदोलन यशस्वीरित्या करण्यात आले. यावेळी चंदूभाऊ भागेश्वर, जयराज पुर्भी, विनोद भालेराव, प्रभाकर वतारी, आरिफ शेख, गोपी साळी, नरेंद्र तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज