fbpx

चाळीसगावात नगरपरीषदेच्या कारभाराविरोधात सामाजिक संघटनांचे बोंबाबोंब आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव शहरातील रस्त्यांच्या कामाला गेल्या चार वर्षांपासून मंजुरी मिळाल्यानंतरही कामे झालेली नाही तसेच शहरात सर्वत्र स्वच्छतेचा बोजबारा उडाला असून साथीच्या आजाराने नागरीक त्रस्त आहेत. यामुळे शहर वासीयाना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नगरपरीषदेच्या वतीने नव्याने रस्ते करण्यात यावेत, शहरात स्वच्छता करण्यात यावी, यामागणीसाठी रयत सेना व मेरा गाव मेरा तीर्थच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

चाळीसगाव शहरात नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत, मात्र पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यावर खोदलेल्या चाऱ्याची  नियमाप्रमाणे कामे केली गेली नाही. सपूर्ण कामे संबंधित ठेकेदाराने बोगस केल्याने वाहने त्यात फसत आहेत. शहरातील ज्या रस्त्यावर पाईपलाईन टाकण्यासाठी कामे केली आहेत ते नव्याने करावीत, शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे उखडले गेल्याने नवीन रस्ते करण्यात यावे तसेच शहरवासीयांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी शहरात नगरपरीषदेने स्वच्छता करावी आदी मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून विविध आंदोलने करण्यात येत आहे. रयत सेना व मेरा गाव मेरा तीर्थच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहराच्या दुरावस्थेबाबत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, मेरा गाव मेरा तीर्थचे प्रवर्तक विजय शर्मा, खुशाल पाटील, किशोर पाटील, रयत सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शहराध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष प्रदीप मराठे, दीपक देशमुख, प्रशांत अजबे, संदीप पवार, पत्रकार नारायण जेठवाणी, अन्याय प्रतिकार संस्थेचे रावसाहेब जगताप आदी सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज