दीड वर्षानंतर महिलेच्या पोटातून बाहेर काढला कापसाचा गोळा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील ४३ वर्षीय महिलेवर एका खासगी रूग्णालयात दीड वर्षांपूर्वी गर्भपिशवीची शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी डॉक्टरांकडून अनावधनाने कापसाचा बोळा महिलेच्या पोटातच राहून गेला होता. त्यामुळे दीड वर्षांपासून महिलेला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. अखेर अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांनी यशस्वीपणे महिलेवर शस्रक्रिया करून, पोटातून कापसाचा बोळा काढला. महिलेला १० दिवस आयसीयूत ठेवल्यानंतर, शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला.

सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील माहेर व नंदूरबार येथील सासर असलेल्या ४३ वर्षीय महिलेवर दीड वर्षांपुर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळे रक्तस्त्राव थांबवण्यासाठी लावलेला कापसाचा बोळा चुकून महिलेच्या पोटातच राहून गेला असावा, अशी माहिती डॉ.अनिल शिंदे यांनी दिली. पारोळा येथील डॉ.हर्षल माने यांच्याकडे महिला उपचारासाठी गेली, असता तिला अमळनेरला नर्मला मेडिकल फाउंडेशनमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.

पोटाच्या सिटी स्कॅनमध्ये कापड सदृष्य बाब निदर्शनास आली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून पोटातून कापसाचा बोळा काढण्यात आला. रात्री ११ ते पहाटे ४ अशी पाच तास ही शस्त्रक्रिया चालली होती. डॉ.संदीप जोशी यांनी मदत केली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -