नपा शाळेत ३६ वर्षांनंतर भरला ७० वर्गमित्रांचा मेळा, आठवणींना दिला उजाळा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । जुने मित्र-मैत्रीण भेटणे म्हणजे आयुष्यातला एक प्रकारचा सोहळाच मानला जातो. त्याचप्रकारे फैजपूर‎ येथील म्युनिसिपल हायस्कूलमधील १९८६ च्या बॅचचे ७० विद्यार्थी‎ रविवारी ३६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र‎ आले. या स्नेहमेळाव्यात सर्वांनी‎ जुन्या शालेय आठवणींना उजाळा‎ दिला.‎

यावेळी‎ बोलताना सेवानिवृत्त शिक्षक‎ ‎पी.जे.राजपूत यांनी, जीवन जगताना‎ आपण आपले कर्म करत राहावे.‎ विपरीत परिस्थिती, संकट आले‎ तरीही आत्मविश्वास कायम ठेवावा.‎ यामुळे सर्व संकटांवर मात करता‎ येतो, असे सांगितले. पी.जे.राजपूत,‎ बी.यू.मेश्राम, नितीन राणे, हेमलता‎ नागपुरे, दत्तू कोळी यांनीही मनोगत‎ व्यक्त केले. नागपुरे यांनी‎ विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर‎ करावा, असे आवाहन केले.‎

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ मसाका माजी संचालक नितीन राणे,‎ तर व्यासपीठावर माजी‎ उपनगराध्यक्ष हेम राज चौधरी, ‎ ‎ एल.के.धांडे, एच.सी.किरंगे, पी.जे.राजपूत, ए.पी.भारंबे, ‎पी.एस.चौधरी, सी.डी.चौधरी, ‎एम.एच.वराडे, एन.एन.नारखेडे, ‎ ‎ सी.के.चौधरी, डी.डी.इंगळे,‎ बी.यू.मेश्राम, बी.जी.चौधरी,‎ डी.के.भंगाळे, इच्छा राम नारखेडे,‎ शकुंतला सराफ, विजया चौधरी,‎ विमल शिंपी, प्रभारी मुख्याध्यापक‎ के.टी.तळेले उपस्थित होते.

हे देखील वाचा:

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -