fbpx

‘ते’ भाजपाचे गटनेते व उप गटनेते आहेत का? – ॲड पोकळे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । जळगाव शहराचा विकास हा शिवसेनेकडून जाणून बुजून रखडला जात असल्याचा आरोप भाजप नेते भगत बालाणी व उप गटनेते राजेंद्र घुगे पाटील यांनी केला होता. मात्र ते स्वतः भारतीय जनता पक्षाचे गटनेते व उप गटनेते आहेत का? याचा अभ्यास त्यांनी करावा अशी टीका ऍड.दिलीप पोकळे यांनी केली आहे.

दिलीप पोकळे पुढे म्हणाले की, जळगाव शहराचा विकास कोण रखडवतय आणि यासाठी कोण राजकारण करते आहे हे अख्ख्या जळगाव शहराला माहित आहे. राहिला प्रश्न गटनेते पदाचा तर भारतीय जनता पक्षाच्या आचारसंहितेचे प्रमाणे या क्षणाला भारतीय जनता पक्षाचा महानगरपालिकेतील गटनेता मी आहे. त्यामुळे आरोप करताना त्यांनी गटनेता हे पद लावू नये असा टोमणा पोकळे यांनी लगावला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज