⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | नॅशनल युथ कौंसिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अ‍ॅड.वाकलकर

नॅशनल युथ कौंसिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अ‍ॅड.वाकलकर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । चाळीसगांव येथील अ‍ॅड. राहूल वाकलकर यांची नॅशनल युथ कौंसिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सार्थ निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय युवा परिषदेचे अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे माजी सल्लागार डॉ.अमर प्रसाद रेड्डी यांनी निवड केली आहे.

देश पातळीवरील निवडीसंदर्भात महाराष्ट्राला पहिल्यांदा बहुमान प्राप्त झालेला आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर पर्यावरण, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, साहित्य, महिलासबलीकरण, दिव्यांग अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारा युवा चेहरा म्हणून राहुल वाकलकर यांची ओळख आहे. इंटरनॅशनल युथ सोसायटीचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कार्यरत असल्याबरोबर रक्तदान चळवळ, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रायटर बँक उपलब्ध करून देणे, पर्यावरण संवर्धनासाठी चाळीसगांव नगरपरिषदेकडून ‘वृक्षमित्र’ सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

जळगांव जिह्याच्या क्रीडा क्षेत्रात विविध खेळाच्या असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवून ग्रामीण भागातील राष्ट्रीय, खेळाडू घडविण्याचा मानस बाळगून सदैव कार्यरत असतात. समाजातील सर्वांगीण उन्नतीचे धोरण अवलंबून शाश्वत विकासासाठी झटणारे अष्ठपैल्लू व्यक्तिमत्त्व अ‍ॅड.राहूल वाकलकर यांची निवड महाराष्ट्राला नावलौकिक मिळवणारी आहे.

आंतरराष्ट्रीय युवा परिषदेला संलग्नित असणारे भारतीय राष्ट्रीय युवा परिषद ही राष्ट्रीय एकात्मता, राजकारण, युवासक्षमीकरण, पर्यावरण, शाश्वत विकासावर कार्यरत असणारे देशातील युवा धोरणासंदर्भातील अग्रगन्य परिषद आहे. निवडीसंदर्भात राष्ट्रीय युवा परिषदेचे अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे माजी सल्लागार डॉ.अमर प्रसाद रेड्डी यांनी निवड केली आहे. महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत गुरव यांनी निवडीचे अभिनंदन करून देशपातळीवरील कार्यास शुभेच्छा दिल्या. युवा धोरणाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष निवडीसंदर्भात सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह