fbpx

भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश सचिवपदी ॲड.विशाल मोहिते यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश सचिवपदी अॕड‌. विशाल हणमंतराव मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी व सांगली जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश मंत्री म्हणून अॕड‌. विशाल हणमंतराव मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड केंद्रीय निवड समितीने केली असून महाराष्ट्रातील सर्व खाजगी कामगार, औद्योगिक क्षेत्राचे प्रभारी म्हणून ही ते काम पाहणार आहेत.
भारतीय मजदूर संघाचे गेले अनेक वर्षे काम करत असलेले वांगी गावचे सुपुत्र अॕड‌. विशाल मोहिते हे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समिती सदस्य म्हणून ही काम पाहत आहेत.

गेले अनेक वर्ष शोषित पीडित वंचित कामगारांच्या प्रश्नासाठी लढणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची कामगार जगतात ख्याती आहे. अनेक आंदोलने करून त्यांनी कामगारांचे प्रश्न मार्गी आहेत. तसेच रचनात्मक कार्यक्रमातून कामगार वर्गाला एक दिशा देण्याचे महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिले आहेत. त्यांच्या ह्या निवाडीमुळे सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज