fbpx

ऍड.विद्या पाटील खून खटला राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभागाने घेतला संशोधनासाठी

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । जामनेर येथील सासर असलेल्या सहा. सरकारी अभियोक्ता राखी उर्फ विद्या भरत पाटील यांचा खून खटला राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभागाने घेतला संशोधनासाठी घेतला आहे. एलएमएमच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना या विषयावर पीएच.डी करता येणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे.

जामनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांतील मयत सौ.राखी उर्फ विद्या भरत पाटील (वय ३५ रा. सुपारी बाग जामनेर) या सहा सरकारी अभियोक्ता गट अ या पदावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ. आर.डी. सिदनाळे यांचे कोर्ट जळगांव येथे कार्यरत होत्या. गुन्ह्यातील आरोपी आणि मयतेचा पती आरोपी क्रमांक १ डॉ.भरत पाटील हा जामनेर शहरात वैद्यकीय व्यवसाय करीत असे. त्यांची मयत पत्नी ही सरकारी वकील असल्याने नोकरी निमीत्ताने तिचे नेहमी पक्षकार, इतर सरकारी वकील यांचेशी नेहमी मोबाईलवरुन संभाषण होत असे. त्यावरून नेहमी संशयाच्या कारणावरून आरोपी क्रमांक १ डॉ. भरत लालसिंग पाटील हा मयताच्या चारीत्र्यावर संशय घेऊन नेहमी भांडण करून मारहाण करीत असे. दि.१३/१/२०२१ रोजी बार रविवार रोजी मयत हिची मान्यायालय जळगांव येथे ड्युटी असतांना मयत ही ड्यूटी साठी जाण्यासाठी निघाली असता, तिला आरोपी क्रमांक १ याने ड्युटीवर न जावुन देता घरात तिला मारहाण केली त्याबाबत मयत हिने तिचे नातेवाईक यांना फोनवरुन माहीती दिल्यामुळे त्यावरुन आरोपी क्रमांक १ पाने तिचा मोबाईल फोडुन टाकला. 

व दुपारी १३.३०वाजेच्या सुमारास मयत हिचा उशीने व हाताने तोंड नाक व गळा दाबुन करुन प्रेत घरात ठेवून मयताचे नातेवाईक यांना मयत विद्या हिस इलेक्ट्रीक शॉक लागला, हृदयविकाराचा झटका आला आहे, असे खोटे सांगुन आरोपी क्रमांक १ व २ याने सदर मयत हिस भुसावल येथे डॉक्टरांना दाखवून पुरावा नष्ठ करणे कामी सदर मयत हिस आरोपीतानी मुळ गाव बेलखेड ता. भुसावल येथे अंतीम संस्कार करणे कामी घेवून गेले होत. सदर खून खटला पी. वाय लाडेकर अति सत्र न्यायाधिश सो सेशन कोर्ट जळगांव न्यायालयात चालवुन न्यायालयाने दि.१३/५/२०२१ रोजी सदर गुन्ह्याचा निकाल दिला.

सदर निकालामध्ये सदर गुन्ह्यांत आरोपी क्रमांक १ यास भा.द.वी. कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची कठोर शिक्षा व १०००/- रुपये दंड दंड न भरल्यास एक महीन्याचा कारावास आरोपी क्रमांक १ व २ यांना भा.द.वी. २०१मध्ये चार वर्ष सक्तमजुर आणि १०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास एक महीना साधा कारावास अशी शिक्षा दिली होती. 

सदर मयत सहाय्यक सरकारी अभियोक्ता सौ राखी उर्फ विद्या भरत पाटील खुन खटला निकाल हा राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभागाने संशोधनासाठी घेतला असून सदर गुन्ह्यांचा तपास व निकाल यावर एल.एल.एम च्या शेवटच्या वर्षाला असणा-या विद्यार्थीसाठी संशोधनासाठी (पी.एच.डी.) करीता ठेवला आहे. 

सदर गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, चाळीसगांव अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पाचोरा उपविभाग, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे जामनेर पोलीस स्टेशनकेतन जे ढाके, सरकारी अभियोक्ता सेशन कोर्ट जळगांव डॉ. निलेश देवराज सहा.प्राध्यापक डॉ. स्वप्नील कळसकर सहा प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव डॉ. हर्षल चांदा उपजिल्हा रुग्णालय जामनेर, पोहेकॉ/ रमेश कुमावत, जामनेर पो.स्टे. पोहेका नरेद्र वारुळे जळगाव संगणक विभाग, पोना योगेश महाजन, जामनेर पोलीस स्टेशन यांचे सदर गुन्ह्यांचे तपास व शिक्षा लावणे कामी अनमोल सहकार्य लाभले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज