अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्या शेतात तिसऱ्यांदा आले चोर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या माचला (ता.चोपडा) शिवारातील शेतात २२ रोजी रात्री तिसऱ्यांदा चोरटे आले होते. मात्र, अवजड लोखंडी मोल्ड उचलणे शक्य न झाल्याने नुकसान टळले, अशी माहिती अ‍ॅड.निकम यांचे बंधू प्रवीण निकम यांनी दिली.

यापूर्वी शेतातील श्री सिमेंट प्रॉडक्ट या कंपनीतून १८ जूनला ५ लाखांचे, तर २१ जूनला १३ लाख ८५ हजार रुपयांचे साहित्य लांबवले होते. त्यानंतर २२ जूनला रात्री चोरटे पुन्हा या ठिकाणी आले. मात्र, सिमेंट पाइप तयार करण्याचे अवजड लोखंडी मोल्ड उचलणे शक्य झाले नाही. 

त्यामुळे चोरट्यांनी काढता पाय घेतल्याचे, घटनास्थळाच्या परिस्थितीवरून दिसल्याचे प्रवीण निकम यांनी सांगितले. कदाचित रात्रीच्या वेळेस गस्तीवरील पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकू आल्याने चोरटे पसार झाले असावेत, असेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज