fbpx

ॲड. रवींद्र पाटलांचा जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ॲड रवींद्र पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

एकीकडे जिल्हा बँकेला ईडीने नोटीस दिली असून दुसरीकडे बँकेची निवडणूक तोंडावर आली असतांनाच रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बँकेशी संबंधित मुक्ताबाई संस्थेच्या कर्जाबाबत बँकेकडून सहकार्य मिळत नसल्याने नाराजीतून त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. संस्थांचे एकरकमी कर्ज परतफेड करण्यात आले आहे.

या बाबत तांत्रिक बाबीसाठी बँक सहकार्य करीत नाही, कायदेशीर विषय असून देखील अडवणूक केली जात असल्याने ऍड. पाटील यांची नाराजी वाढली होती. त्यांनी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे राजीनामा दिला आहे, अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे खेवलकर या राजीनाम्यावर निर्णय घेतील. अॅड.रवींद्र पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

अद्याप पाटील यांचा राजीनामा मान्य करण्यात आलेला नाही. कदाचित तो मान्य न करता रवींद्रभैय्यांची समजूत देखील काढली जाईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज