मोबाइलवर बोलत रुळ ओलांडणे बेतले जिवावर, पहूरपेठचा प्रौढ ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । मोबाइलवर बोलत रुळ ओलांडणे पहूरपेठमधील प्रौढाच्या जिवावर बेतले आहे. पाचोरा रेल्वे स्थानक परिसरातील रूळ ओलांडतांना अचानक रेल्वे आल्याने त्यांचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू झाला. कडुबा हरी भडांगे (वय ४१, रा.संतोषीमाता नगर, पहूरपेठ) असे मृताचे नाव आहे.

याबाबत असे की, पहूरपेठ येथील कडुबा भडांगे हे कामासाठी शुक्रवारी पाचोरा येथे गेले होते. पाचोरा रेल्वे स्थानक परिसरातील रूळ ओलांडतांना अचानक रेल्वे आल्याने त्यांचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पाचोरा रेल्वे दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलवर बोलत रुळ ओलांडताना, ही दुर्घटना घडल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. घटनेनंतर रेल्वे चालकाने स्टेशन मास्तरांना माहिती देऊन घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. नातेवाइकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -