शिरसोली येथे जिन्यावरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । शिरसोली येथे जिन्यावरून खाली पडल्याने एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

सविस्तर असे की, शिरसोली प्र.न.येथील रामदास डेंगळे (वय ५२) हे शेतीतील मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवार दि.१२ रोजी रात्री ९ वाजता ते जेवण करून छतावर गेले होते. दरम्यान, गच्चीवरून लोखंडी जिन्यातून खाली उतरत असताना त्यांचा पाय घसरला व ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

पश्चात पत्नी, हिरकणबाई, मुलगा प्रवीण आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -