fbpx

जळगावात प्रौढाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । जळगाव भादली रोडवरील असोदा रेल्वे गेट नजीक एका ५५ वर्षीय प्रौढाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. यशवंत हेमराज चौधरी (वय ५५, रा. जुना खेडी रोड) प्रौढाचे नाव असून या संदर्भात शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आसोदा रेल्वे गेटजवळ असलेल्या अप लाईनवर खंबा क्रमांक ४२१/२५-२८ दरम्यान यशवंत चौधरी  यांनी धावत्या रेल्वे गाडी खाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा मृतदेह रूळांवर आढळून आला. मयत व्यक्तीच्या खिशात असलेल्या डायरीवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. 

या बाबत शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात पाठविले आहे. या संदर्भात शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज