आदित्य ठाकरे बेपत्ता, पोलिसात तक्रार दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील हबर्डी येथील आदित्य ठाकरे हा १९ वर्षीय तरुण गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता झाला आहे. महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला होता गेला होता. परंतु घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी फैजपूर पोलीस स्थानकात बेपत्ता आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत असे की, आदित्य ठाकरे हा १ जानेवारी रोजी यावल येथील कला वाणिज्य महाविद्यालयात जात असल्याचं सांगून तो घरून निघून गेला. तेव्हापासून सकाळपासून घरातून बाहेर पडलेला मुलगा सायंकाळीपर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली.

घरच्या सदस्यांनी याबाबत महाविद्यालयातील मित्रांसह सर्वच ठिकाणी शोध घेतला असता आदित्य काही मिळून आला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोध घेता असता त्यात देखील आदित्य मिळून आला नाही. यामुळे हताश झालेल्या कुटुंबीयांनी फैजपूर पोलीस स्टेशन गाठून मुलगा आदित्य हरविल्याची तक्रार नोंदविली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षण सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बऱ्हाडे करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -