fbpx

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा : कोणत्याही रुग्णचा ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । पाचोरा ग्रामीण रुग्णालयात काही दिवसापूर्वी 2 रुग्णचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता अशी माहिती आली पण पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील अधिक्षक डॉ अमित सांळुंखे यांनी अशा प्रकारच्या माहिती चे खंडन केले आहे ही निवळ अफवा आहे.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन चा पुरेसा साठा आहे कृपया नागरिकांनी अशा अफवावर विश्वास ठेऊ नये. सर्व पाचोरा ग्रामीण रुग्णालयात 30 कोविड रुग्ण उपचार घेत आहे. त्यापैकी 24 ऑक्सिजन वर आहेत. तर  3 रुग्ण व्हॅटीलेटर वर आहेत तर एकूण 30 ऑक्सिजन सिलेंडर असून 13 सिलेंडर भरलेले आहेत व 4  कार्यरत आहेत. ऑक्सिजनचा साठा आहे.

mi advt

ऑक्सिजन साठा सपंण्याआधी जिल्ह्याधिकारी कार्यालयातून पुरेसा साठा वेळेत येऊन जातो. गेल्या एक वर्षापासून पाचोरा ग्रामीण रुग्णलयात 469 रुग्ण पैकी 433रुग्ण बरे होऊन घरी गेले गेले आहे. पाचोरा शहाराचा रिकव्हरी रेट हा 93%  एवढा आहे जळगाव जिल्ह्यातील सरासरी रिकव्हरी रेट पेक्षा जास्त आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज