पुणे-पाटणा विशेष उत्सव ट्रेनची अतिरीक्त फेरी धावणार; बुकिंग आजपासून

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । पुणे-पाटणा विशेष उत्सव ट्रेनची अतिरीक्त फेरी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 03381 विशेष उत्सव ट्रेन शुक्रवार, 26 रोजी पाटणा येथून सुटेल आणि 03382 विशेष उत्सव ट्रेन रविवार, 28 रोजी पुणे येथून सुटणार आहे. 03382 विशेष ट्रेनच्या अतिरीक्त फेरीसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 26 नोव्हेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर करता येणार आहे.

दरम्यान, या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज