fbpx

जळगाव आगारातून रक्षाबंधनानिमित्त जादा बसफेऱ्या सुरु

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२१ । एसटीचा कोरोनाने बुडालेला व्यवसाय मार्गावर येत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने तसेच रक्षाबंधन सणानिमित्त जळगाव बसस्थानकात गर्दी होत आहे. त्यामुळे जळगाव आगाराने सुरत १, नाशिक ३, पुणे १, अकोला ३ अशा जादा बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता जळगाव आगारातून १७५ पेक्षा अधिक बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत.

जादा बसेस मंगळवार, बुधवारपर्यंत धावतील. यात सकाळी पाच वाजेपासून बसफेऱ्यांना सुरुवात होऊन रात्री १.३० वाजेपर्यंत लांब पल्ल्याच्या बसेस धावणार आहेत. एसटीला सर्वात जास्त प्रवासी याच दिवशी मिळत असल्याने ही गर्दी कॅश करण्यासाठी महामंडळाने कंबर कसली.

प्रतिसाद पाहून निर्णय

गेल्या वर्षी कोरोनाचे मोठे सावट निर्माण झाले होते; मात्र, आता कोरोना नियंत्रणात आहे. तरीदेखील पूर्ण दक्षता घेऊन एका बसमध्ये अधिक गर्दी होणार नाही याची दक्षता घेत स्थानिक पातळीवर मागणी वाढल्यास बस सोडण्यात येईल. तसेच सुरत, नाशिक, पुणे, अकोला येथे बसफेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत, असे अागारप्रमुख नीलेश पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज