… तर हॉकर्सवर होणार फौजदारी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील महात्मा फुले मार्केट ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे हॉकर्सला लवकरच पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे फुले मार्केटमध्ये व्यवसाय करतांना आढळून आल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन साहित्य जप्तीची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त शाम गोसावी यांनी दिली.

जळगाव महापालिकेकडून महात्मा फुले मार्केटला ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्यात आले आहे. मात्र, या ठरावाची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. दरम्यान, फुले मार्केटमध्ये ‘नो हॉकर्स झोन’ची अंलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी फुले मार्केटमधील गाळेधारकांकडून करण्यात आली होती. या मागणीची दाखल घेत महापालिका प्रशासनाने फुले मार्केटमध्ये ‘नो हॉकर्स झोन’च्या अंमलबजावणीला सुरुवात केली असून अतिक्रमण विभागाचे पथक तैनात केले आहेत.

लवकरच पर्यायी जागा
फुले मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सला लवकरच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हॉकर्सने फुले मार्केटमधील ‘नो हॉकर्स झोन’चे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे व याठिकाणी व्यवसाय करू नये. या ठिकाणी व्यवसाय करतांना आढळून आल्यास हॉकर्सवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊन साहित्य जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तसेच पथविक्रेता समिती गठीत करून हॉकर्सचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच लसीकरण न केलेल्या हॉकर्सला बसू दिले नाही, अशी माहिती उपायुक्त शाम गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान, फुले मार्केटमध्ये होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशा सूचना महापालिका प्रशासनाकडून फुले मार्केटमधील व्यापारी असोसिएशनला देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -