fbpx

चाळीसगाव महसूल पथकाची कारवाई, वाळूचे ट्रॅक्टर जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । बेकायदा वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आणि 1 ब्रास वाळू सह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती अशी की निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, मंडळअधिकारी शैलेंद्र परदेशी, शहर तलाठी बी के मेन,गणेश गढरी, ऋषिकेश सूर्यवंशी, सुरेश जाधव, यांचे पथक काल शुक्रवारी पहाटे गस्तीवर असताना 2.20 वाजेच्या सुमारास करगाव रस्त्यावर गणपती लॉन्ससमोर करगाव कडून चाळीसगावकडे येत असलेले विना नंबरचे लाल रंगाचे महिंद्रा सरपंच कंपनीचे वाळूने भरलेला ट्रॅक्टर महसूल पथकाला दिसले.

mi advt

पथकाने ट्रॅक्टर थांबवले असता त्यात विनापरवाना वाळू दिसून आली. पथकाने 1 ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टर तहसील आवारात जमा केले. व महसूल पथकाने पुढील कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज