अनधिकृत बेसमेंटधारकांवर २५ पासून कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । बेसमेंट पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, आता कोणतीही सबब किंवा कारणे न दाखविता थेट २५ पासून कारवाई करावी असे आदेश महापौर, उपमहापौरांनी दिले आहेत. सोमवारी रोजी महापौरांच्या दालनात नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मार्केटमधील बेसमेंटधारकांची सुनावणी प्रक्रिया घेऊन अनधिकृत वापर असल्याचे आढळून आले आहे. अशांवर थेट करवाईचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

यांची होती उपस्थिती 

या बैठकीत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह नगरसेवक ऍड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, बेसमेंट पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, आता कोणतीही सबब किंवा कारणे न दाखविता थेट २५ पासून कारवाई करावी असे आदेशच महापौरांनी दिले. यासह नगररचना विभागातील बांधकाम परवानगींचा अनेक फाईल प्रलंबित आहेत. त्यामुळे आठवडाभरात रखडलेल्या फायलींचा निपटारा करण्याचा सूचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या आहेत.

भंगार बाजार मनपा ताब्यात घेणार?

शहरातील अजिंठा चौकातील भंगार बाजारची मुदत संपली असून, हा बाजार ताब्यात घेण्याबाबत महासभेत ठरावदेखील झाला आहे. ही जागा ताब्यात घेण्याबाबत उपायुक्तांनी प्रकरण तयार केले असून, या प्रकरणावर मनपा आयुक्तांचीही स्वाक्षरी झाली असून, दोन दिवसांत भंगार बाजार ताब्यात घेण्याबाबत मनपाकडून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज