fbpx

कोरोनाच्या निर्बंधाचे उल्लघन : भुसावळात दुकानदारांसह विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । लॉकडाऊनसह कोरोनाच्या निर्बंधाचे उल्लघन केल्याप्रकरणी शहरातील विविध दुकानदार, विक्रेत्यांवर पालिकेसह पोलिसांच्या पथकाने सोमवारी कारवाई केली. या कारवाईत 26 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आल्याने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली.

शहरात सहाय्यक पोलिस अधिक्षक आर्चित चांडक, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व पालिकेच्या पथकाने शहरात कारवाई केली. पाहणीत बंदचे नियम झुगारुन दुकान सुरु ठेवल्याप्रकरणी मनिष मॉल व जनता टिव्ही या दोन्ही दुकानांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार दुकानदार, व्यापारी व कामगारांना अ‍ॅन्टीजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नियमांना डावलून विना चाचणीने दुकान उघउून विक्री करणार्‍या एका व्यवसायीकास 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. 

यासोबतच मुख्य बाजारपेठ व विविध भागांमध्ये मास्कविना फिरणारे, सोशल व फिजीकल डिस्टंन्सींगचा अनादर, क्षमतेपेक्षा अधिक ग्राहकांची गर्दी आदी नियम मोडणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाकडून आता दररोज या पध्दतीने व्यापक कारवाई होणार आहे. यावेळी पालिकेचे विशाल पाटील, किशोर जंगले, लोकेश ढाके, सुनील शेकोकारे, इकबाल शेख आदींसह शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज