fbpx

केळी पिकाचे मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न प्राप्त करावे ; आ. शिरीष चौधरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । केळी पिकाचे मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न प्राप्त करावे, असे आवाहन आ. शिरीष चौधरी यांनी केले. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात सोमवार दि. १३ रोजी ‘निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या प्रसंगी ते बोलत होते.

पाल येथील कृषी विज्ञान केंद्र, मुंबई येथील अपेडा कार्यालय व जळगाव येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन आमदार शिरिष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत केळी तज्ञ डॉ. के.बी. पाटील, जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सी.डी. बडगुजर यांनी उपस्थितांना नाविन्यपूर्ण बाबी सह तंत्रज्ञानाची माहिती दिली. अपेडाचे क्षेत्र अधिकारी लोकेश गौतम, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे निखील कुलकर्णी, किरण जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रभारी महेश महाजन यांनी तर सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले. आभार शास्त्रज्ञ अतुल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. धीरज नेहेते, शरद वाणी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी उपस्थितांना विविध योजनांची माहिती देतांना शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाकरीता शासकीय योजनांची मदत घ्यावी व उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले. कार्यशाळेस सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक एम.ए. चौधरी, खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्बान तडवी, सनी दमानिया यांसह परिसरातील केळी उत्पादक व शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज