fbpx

दरोड्यातील संशयिताकडून पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ ऑगस्ट २०२१ । यावलमधील जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीने तालुका पोलीस ठाण्यातील शौचालयात जाऊन अंगावर धारदार काचेने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मुकेश प्रकाश भालेराव असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, यावल पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात संशयित मुकेश भालेराव याला अटक केल्यानंतर तालुका पोलिसांनी त्यांच्याकडील एका गुन्ह्यात शुक्रवारी सायंकाळी त्यास ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केली. तेव्हा संशयिताने शौचाला जायचे असल्याचे सांगत तालुका पोलीस ठाण्यातील खिडकीच्या तुटलेल्या काचेच्या साहाय्याने पोटाच्या डाव्या व उजव्या बाजूस, तसेच छातीवर व दोन्ही मांडीवर दुखापत करून आत्महत्येचा प्रयत्न केला. काचेचा तुकडा शौचालयाच्या भांड्यात फेकून दिला.

या प्रकारानंतर लागलीच संशयिताला भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. हवालदार प्रवीण युवराज पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयिताविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज