दंगलीच्या गुन्ह्यातील पाचोर्‍यातील पसार आरोपी अखेर जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ ।  शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह दंगल माजवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तब्बल नऊ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणार्‍या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने अखेर 9 रोजी गोपनीय माहितीवरून मुसक्या आवळल्या आहेत. शरद मिस्त्री ऊर्फ शरद निंबा चौधरी ( रा.पंचमुखी चौक, बाहेर पुरा, पाचोरा ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सविस्तर असे की, 21 मार्च 20212 रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात भाग 5, गुरनं.55 /2012 भा.द.वी क. 143 , 147 , 148 , 149 , 353 प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील वाण्टेड आरोपी शरद मिस्त्री हा पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला होता मात्र, आरोपी पाचोरा शहरात आल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर मंगळवार, 9 रोजी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, चालक कॉन्स्टेबल मुरलीधर बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज