fbpx

बलात्कारातील आरोपीचे गोदावरी रुग्णालयातून पलायन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीवर नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना आरोपीने कैदी वॉर्डातील खिडकी तोडून पलायन केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमाराास घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. 

शंकर रविंद्र चौधरी (शिव कॉलणी, चाळीसगाव) असे पसार आरोपीचे नाव आहे. आरोपी शंकर चौधरीविरोधात  चाळीसगाव पोलीस स्टेशन गुरनं. 288/20 भादंवि कलम 376 अनवये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली होती मात्र 22 जूनपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्याच्यावर डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये गार्ड बंदोबस्तात उपचार सुरू आहे. 

शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपी उपचार सुरू असलेल्या कक्षातील खिडकी तोडून पलायन केल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. आरोपीचा जिल्हाभरात शोध सुरू करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज