भुसावळ येथे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरातील पंचशील नगरात वैमनस्यातून २८ वर्षीय तरुणाच्या निर्घृण खुनाची घटना ६ मे २०१८ रोजी घडली होती. या खटल्यात दोषारोप सिद्ध झाल्याने आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव याला न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. मृताचा भाऊ तथा फिर्यादी चेतन वाघमारे, हसन तडवी, प्रकाश गायकवाड, डॉ.एन.ए.देवराज यांची साक्ष या महत्वाची ठरली.

पंचशील नगरातील रहिवासी आनंद अशोक वाघमारे (वय २८) या तरुणाचा खून पूर्ववैमनस्यातून ६ मे २०१८ रोजी खून झाला होता. त्यात आनंदचे पोट व पाठीवर चाकूने ११ वार झाले होते. या खूनप्रकरणी प्रल्हाद होलाराम सचदेव (भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर कामकाज सुरू होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. मृत आनंदचा भाऊ तथा फिर्यादी चेतन वाघमारे, हसन तडवी, प्रकाश गायकवाड, डॉ.एन.ए.देवराज यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपीला जन्मठेप व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा करावास अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता प्रवीण भोंबे यांनी काम पाहिले.

या गुन्ह्याचा तपास तात्कालिन उपनिरीक्षक अनिस शेख यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार समीना तडवी, केस वॉच म्हणून गयास शेख यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज