fbpx

अट्टल सायकल चोरटा जाळ्यात, १८ सायकली हस्तगत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । जळगाव शहरातील विविध भागातून चोरी केलेल्या सायकली कमी दरात विक्री करणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी भेड्या ठोकल्या आहे. गणेश दौलत साबळे (वय-४२,  रा. खडका रोड, भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, त्याच्याकडून चोरी केलेल्या १८ सायकली जप्त करण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, शहरातील नेहरू पुतळा ते टॉवर चौक दरम्यान असलेल्या कॉटनकिंग दुकानासमोर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना दिसून आला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची एक सायकल काढून दिली. त्यानंतर ६ चोरीच्या सायकली काढून दिल्या. अधिक कसून चौकशी तर त्याने १८ चोरीच्या सायकली काढून दिल्यात. त्याच्या खिश्यातून चाव्यांचा गुच्छा आढळून आला आहे. त्यामुळे अजून काही चोरीच्या सायकली मिळण्याच्या असल्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, रतन गिते, योगेश इंधाटे, संजय झाल्टे  यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज