fbpx

दवाखान्यातून फरार झालेला आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना फरार झालेल्या आरोपीस चाळीसगाव पोलिसांनी आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास अटक केली. 

 आरोपी शंकर रविंद्र चौधरी 24 रा शिव कॉलनी चाळीसगाव हा नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जळगाव मध्यवर्ती कारागृहात न्यायायलीन कोठडीत असतांना त्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास गोदावरी फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दि 26 जून रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास हॉस्पिटलच्या चौथ्या माळ्यावरून खिडकीची जाळी तोडून फरार झाला होता. तेव्हा पासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

हा आरोपी चाळीसगावी असल्याची गोपनीय माहिती डीबीचे पो.कॉ. भूषण पाटील, सतिष राजपूत यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दि 29 जून रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास चालीसगाव महाविद्यालयाजवळील वाय पॉइंटजवळ सापळा रचून आरोपी शंकर चौधरी यास अटक केली आहे. सदर घटनेत एएसआय अनिल अहिरे, पो कॉ शैलेश पाटील, विजय पाटील, दीपक पाटील, शरद पाटील यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt