fbpx

ब्रेक फेल झाल्याने रिक्षाचालकाचा अपघाती मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । मालवाहू रिक्षाचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी शहरातील समता नगरातील जिजाऊमाता चौकात घडलीय. युवराज उर्फ भगवान गोविंदा बाविस्कर (वय-३२) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणीरामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

युवराज बाविस्कर हा गेल्या सहा महिन्यांपासून जळगावात पत्नी व दोन मुलांसह मालवाहू रिक्षाचा व्यवसाय करण्यासाठी आला होता. आज सकाळी किरकोळ कामासाठी मालवाहू (एमएच १९ एस ७१४२) रिक्षा घेवून गेले. मालवाहू रिक्षात विटा भरून समता नगरातील जिजाऊमाता चौकातील उतरतीवरून येत असतांना अचानक मालवाहूरिक्षाचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे युवराज बाविस्कर यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि थेट समोरच्या घराला धडक दिली.

यात युवराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीत मृत्यू झाला. अपघातात एकाच्या घराचे वॉलकंपाऊंड पडून नुकसान झाले असून वाहनाचा पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज