हातावरील ‘मेहंदी’ पुसण्याचा आत ‘कुंकू’ पुसण्याची वेळ, पतीचा अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय, अशातच मन सुन्न करणारी घटना समोर आलीय. वधूच्या अंगावरील हळदीचा रंग व हातावरील मेहंदी जशीच्यातशी असताना तिच्या कपाळावरील कुंकू पुसण्याची वेळ आली आहे. कारण लग्नाच्या आठ दिवसानंतर उधळी येथील सचिन चिंतामण चौधरी (वय २६) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने कुटुंबात मोठी शोककळा पसरली.

याबाबत असे की, दीपनगर येथील ‘पाॅवर हाउस’मध्ये नोकरीवर असलेल्या सचिनचे लग्न २४ डिसेंबरला मोठ्या थाटामाटात व आप्तेष्ट, मित्र परिवाराच्या साक्षीने भोकरी, ता. मुक्ताईनगर येथे तेथील समाधान वामन पाटील यांच्या कन्येशी मोठ्या थाटामाटात व रीतिरिवाजाप्रमाणे लग्नसोहळा पार पडल्याने सर्वत्र आनंद हाेता.

नव दाम्पत्याच्या अंगावरील हळद ओली होती, हातावर मेहंदी सजलेली होती. संसार वेल बहरण्याच्या मार्गावर असताना काळाने घात केला. जणू कानात शिसे ओतल्याप्रमाणे उदळीत या दुर्दैवी घटनेची बातमी पाेहाेचताच सगळा चाैधरी परिवार व संपूर्ण गाव सुन्न झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सपाेनि आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल मनोहर पाटील तपास करत आहेत.

शुक्रवारी शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
दरम्यान शुक्रवारी दुपारी सचिन चाैधरी याच्यावर उदळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते. या दुर्दैवी घटनेविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -