जळगाव-म्हसावद रस्त्यावर अनोळखीचा अपघाती मृत्यू, ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । रविवारी रात्रीच्या सुमारास वावडदा ते म्हसावद-वावडदा रस्त्यावर एका तरुणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रविवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास वावडदा ते म्हसावद रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तरुणाचे वय अंदाजे ४० असून त्याची ओळख पटत नाही. मयताच्या उजव्या हातावर ‘जितू’ असे नाव मराठीत गोंदलेले आहे. जिल्ह्यात किंवा परिसरात कोणी हरवलेला असेल किंवा कोणत्या प्रकारची माहिती मिळाली तर हेमंत पाटील 7972775519 या क्रमांकावर किंवा एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव 02572210500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज