बहिणीला घेऊन येत असलेल्या भावाच्या दुचाकीला अपघात ; दोन बालकांसह चौघे जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । शिरसोली येथून शहरात येणाऱ्या दुचाकीला हॉटेल MH 19 जवळ बैलाने ठोस मारल्याने भीषण अपघात झाला असून बहीण भाऊ व बहिणीचे दोन मुलांना जबर मार लागला आहे. बैल आडवा आल्याने झालेल्या अपघात चराहीजण जण रस्त्यावर फेकले गेले तर दुचाकीच नुकसान होऊन ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन पडली.

शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून शिरसोली येथील रहिवासी भारती राहुल गायकवाड (वय २३) या विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्याने वादाबद्दल तिने माहेरी सांगितले. माहेराहून भरती हीच भाऊ आकाश दिनेश जाधव (वय २१) तिला माहेरी नेण्यासाठी शिरसोलीत आला होता. आकाश व त्याची बहीण भारती व तिचे मुलं राज (वय ४ ) आणि आर्यन ( वय १ ) यांना घेऊन जळगावात येत असताना रस्त्यामध्ये हॉटेल MH १९ जवळ रस्त्यात अचानक बैल आडवा आल्याने दुचाकीला धडक बसली हा अपघात बघून अनेक चाकरमानी रस्त्याने जात असताना तिथे थांबले. व जखमी झालेल्या आकाश व त्याची बहीण आणि बहिणीच्या दोन मुलांना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली. रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने आकाश व त्याच्या बहिणीला रिक्षेने रुग्णालयात नेण्यात आले.

- Advertisement -

बहीण भारती गायकवाड यांना पायाला मार लागला आहे. आकाश जाधव याच्या डाव्या हाताला व पायाला जबर मार लागला असून फॅक्चर झाले आहे. तर लहान आर्यन व राज यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे प्रथमोपचार करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

- Advertisement -

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar