यावल-फैजपूर रस्त्यावर अपघात, जखमी तलाठीचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । गेल्या गुरुवारी यावल-फैजपूर रस्त्यावर दुचाकी-अँपे रिक्षाची धडक होऊन तीन जण जखमी झाले होते. त्यापैकी यावल येथील जखमी सहाय्यक तलाठी राजेंद्र झांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. झांबरे यांच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

यावल शहरातील सहाय्यक तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे (वय ५०) हे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दुचाकीने फैजपूरकडे जात होते. तर शेख सलीम शेख गफ्फार (वय ३५) आणि सय्यद अबू बकर सय्यद इब्राहिम (वय ३२, दोघे रा.डांगपुरा, यावल) हे फैजपूरकडून रिक्षा घेऊन यावलकडे येत होते. शेख सलीम शेख गफ्फार हा रिक्षा चालवत होता. चितोडा गावाजवळ रिक्षा व दुचाकीची धडक झाली होती. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे झांबरे यांनी अखेरचा श्वास घेतला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -