fbpx

तरसोद फाट्याजवळ विचित्र अपघात, ८ जण जखमी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ मालवाहू ट्रालावरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रालाची झाला जोरदार धडक दिल्याची घटना आज मंगळवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची घटन घडली. जखमींना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

हा ट्राला जळगावकडून भुसावळकडे जात होता. अपघात घडल्यानंतर मागे व पुढे चालणाऱ्या वाहनां देखील जोरदार धडक दिली आहे. यात भुसावळकडे जारी कार व प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली. अशा विचित्र अपघातात जवळपासून सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जखमींचे नावे स्पष्ट झालेले नाही.,

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज