पिंपळगावजवळ भीषण अपघात; दोघे ठार, दोन गंभीर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । पिंपळगाव हरे ते भोजे दरम्यान दोन मोटरसायकलींमध्ये जोरदार धडक झाल्याने भोजे चिंचपुरा येथील दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली.

पिंपळगाव हरे ते भोजे दरम्यान मोटारसायकल क्रमांक एम.एच.१९ डी.ए. ०३६१ व मोटारसायकल क्रमांक एम.एच. १९.१४७६ यांची समोरा समोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार जीवन संतोष कदम (वय १७) व नरेंद्र भगवान गव्हाले (वय २०) हे जागीच ठार झाले. अपघातात बबन शब्बीर तड़वी व जब्बर अब्दुल तड़वी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मयत व जखमींना पिंपळगाव हरे येथील १०२ रुग्णवाहिका चालक बाजीराव गीते यांनी तात्काळ पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -