नशिराबाद टोल नाक्याजवळ अपघात, दोघे जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । नशिराबाद ते भुसावळ दरम्यान टोल नाक्याच्या पुढे दुचाकीचा भीषण अपघात शुक्रवारी सकाळी घडला आहे. अपघातात दोघे जागीच ठार झाले. राजेंद्र भादू डोळे ( वय ४२; पाटीलपुरा सावदा, ता. रावेर) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय५३ रा सावदा) असे मयताचे नाव आहे.

नशिराबाद टोल नाक्याच्या पुढे असलेल्या पाटील नर्सरीजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याचे समजते. घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांची गर्दी झाली असून ओळख पाठविण्याचे काम सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज