हिरापुर जवळ अपघात, पाच जण जागीच ठार?

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील क्रूझर गाडीला चाळीसगाव जवळील हिरापुरजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

डोंगरगाव येथील १४ प्रवासी मजूर क्रूझर गाडीत नांदगावकडे जात होते. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील भावसार पेट्रोल पंपाजवळ चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व प्रवासी नांदगाव येथील असल्याची माहिती आ.मंगेश चव्हाण यांनी दिली असून त्यांनी अपघातस्थळी पोहचत मदतकार्य सुरू केले आहे.

क्रूझरमध्ये मनमाड येथील एफसीआय गोडाऊनला हमाली कामासाठी जाणारे मजूर होते. क्रूझर गाडी पलटी झाल्याने अपघात घडला असून पाचोरा तालुक्यातील नांदगाव येथील बहुतांश मजूर तडवी बांधव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -