fbpx

शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य करा ; लालबावटा शेतमजूर युनियनचे निवेदन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । गेल्या ७ ते ८ महिन्यापासून भारतातील पंचावन्न शेतकरी संघटना  केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायदे रद्द करणेसाठी आंदोलन करीत आहेत. मोदी सरकार एकीकडे तालिबानशी बोलणे करते आहे. पण सरकारने शेतकऱ्यांच्या नेत्यांची बोलणे करावी, त्यांचे म्हणणे मान्य करावे असे आवाहन करून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामीण भागांमध्ये व शहरी भागांमध्ये कामाची नितांत गरज लक्षात घेता पावसाळी कामांच्या बरोबर रोजगार हमीचा कामाचा पर्याय कायम बाराही महिने उपलब्ध द्यावा व  रोजगार हमी योजनेचे जतन करावे. 

त्याच्या निधीत वाढ करावी, शेतमजुरांच्या वेतनामध्ये केरळ सरकार प्रमाणे दर दिवसाला साडेतीनशे रुपये वेतन द्यावे. या शेतमजूर शेतकरी यांच्या मागन्यानसाठी लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे राष्ट्रपती, तहसीलदार अनिल गावित यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मनरेगा मधील भ्रष्टाचार, वशिलेबाजी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी वर कठोर कारवाई करा! रोहयोची कामे जेसीबी मशीनद्वारेन करता मजुरांच्या सहाय्यानेच करा! मागेल त्याला काम त्वरित द्या! काम न मिळाल्यास बेकारी भत्ता त्वरित मिळावा, रोजगार हमी योजना गाव, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर संघटना व शासन प्रशासनाचे प्रतिनिधीची संयुक्त दक्षता समिती गठीत करा शेतमजुरांच्या  काही मागण्या व शेतमजुरांसाठी सर्व समावेशी केंद्रीय कायदा करा दलित आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घाला. 

मजुरांच्या मुलांना पहिली तर महाविद्यालयीन मोफत शिक्षण  हक्क आहे हे घटनेत नमूद करा भूमिहीन शेतमजुरांना पक्का घरासाठी पाच लाख रुपये अनुदान द्या, शेतमजुरांना 55 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर पाच हजार रुपये पेन्शन द्या, भूमि सुधार कायद्याअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना गावातील पडीत जमीन व सिलिंग जमीन वाटप करा, अनुसूचित जाती जमाती यांचेसाठी  सामाजिक कल्याण योजनाचा निधी इमानदारीने खर्च करा अन्न सुरक्षा योजनाच्या अंतर्गत शेतमजुरांच्या सर्व कुटुंबियांना प्रत्येकी दहा किलो गहू व पाच किलो तांदूळ दरमहा मिळावा,  वाढत्या महागाईला पायबंद घाला, पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेले डाळी शेतकऱ्यांच्या उपयोगी औषधे खते बी-बियाणे यांचे दर कमी करा केंद्र सरकारने ला दलेले तीन शेतकरी कायदे रद्द करा.

आंदोलन करता शेतकऱ्यांशी बोलणी करा असे नमूद करण्यात आले आहे. निवेदन सादर करते वेळी शेतमजूर युनियनचे नेते कामरेड अमृत महाजन यांचे नेतृत्वात वासुदेव कोळी, रतिलाल भील, अरमान तडवी, मीनाक्षी सोनवणे, रेशमाबाई बारेला, नंदाबाई चौधरी, रेखाबाई भालेराव, आदी शेतमजूर युनियन व विविध संघटना प्रतिनिधींचा समावेश होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt