fbpx

कोणत्या नेत्याची कुठे भागीदारी हे लवकरच समोर आणणार : अभिषेक पाटील

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ ।जो कार्यकर्ता पक्षाचे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करतो त्यावर असे खोटे आरोप होत असतात. परंतु आरोप करण्याने आपली पार्श्वभूमी अगोदर बघावी आणि नंतर आरोप करावे. जामनेर येथील बीओटी तत्वावर बांधल्या जाणाऱ्या संकुलात माझी भागीदारी असल्याचे आरोप झाले. ज्यांनी हे आरोप केले त्यांनी अगोदर ते सिद्ध करावे. कोणत्या नेत्याची कुठे भागीदारी आहे हे मी लवकरच समोर आणणार” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले की, माजी मंत्री गिरीश महाजन आणि माझी भागीदारी आहे असे आरोप होत आहेत. सोशल मीडियात याबाबत पोस्ट पसरवल्या जात असून त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. ज्यांनी आरोप केले ते पक्षाचे सदस्य देखील नाही. जामनेर बीओटी प्रकल्पात मी भागीदार असेल तर ते सिद्ध करावे, जर मी भागीदार असेल तर प्रशासन जे सिद्ध करेल सर्वांसमोर होईल. पण जे भागीदार आहेत त्यांची नावे मी लवकरच जाहीर करेल, असेही अभिषेक पाटील यांनी सांगितले.

कोणते नेते कुठे भागीदार आहेत हे मी लवकरच समोर आणेल. आरोप करणारे जे आहेत त्यांचा पूर्व इतिहास लक्षात घेता जनतेला माहिती आहे त्यांनी किती कामे केली आहेत. तसेच कोणतेही काम न करता यांच्याकडे पैसा आला कुठून? त्यांनी दुसऱ्यांना नैतिकता शिकवू नये असा टोमणा देखील अभिषेक पाटील यांनी लगावला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज