fbpx

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ ।  येथील युवा गीतकार, संगीतकार व दिग्दर्शक अमोल ठाकुर यांनी निर्मित केलेला सुंदर अभंग “देह सोनियाचा माझ्या विठ्ठलाचा” या भक्ति गिताच्या पोस्टर चे अनावरण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अजिंठा शासकीय विश्राम गृह येथे करण्यात आले.

याप्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे विनोद ढगे, गीतकार, संगीतकार अमोल ठाकुर, अभिनेते- सचिन महाजन, सहाय्यक दिग्दर्शक -दिपक महाजन, कॅमेरामन- रवी परदेशी उपस्थित होते. या व्हिडीओ अल्बममधील सर्व कलावंत हे जळगावचे असून, जळगांवचे कलावंत प्रतिभासंपन्न असुन, पुणे, मुंबई च्या कलावंतांपेक्षाही खान्देशचे कलावंत कुठेही कमी नाहीत हे या कलावंतांनी दाखवून दिले आहे.

अमोल ठाकुर यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेले भक्तीगीत हे गायक कपिल शिंगणे यांच्या सुमधुर आवाजात असुन, यात मुख्य भूमिका सचिन महाजन, ईश्वर पाटील, काजल तायडे यांनी साकारली आहे. या गिताचे संकलन हे सचिन कापडे यांनी केले आहे. जळगावातील केकतनिंभोरा व आव्हाने या ठिकाणी झालेले गीताने छायाचित्रण सुंदर आहे. अशा शब्दात पालक मंत्र्यांनी भक्ति गीताचे कौतुक केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज