⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

शिरसाळा मारोतीचे दर्शन घेऊन परताना काळाचा घाला; अपघातात तरुणाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारोतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. दुचाकीची बैलगाडीला धडक झाल्याने साकेगाव येथील तुषार बंडू बाविस्कर (वय २२) याचा मृत्यू झाला. ही घटना हरताळा फाट्याजवळ घडली.

याबाबत असे की, साकेगाव येथील चुडामण नगरातील रहिवासी तुषार बंडू बाविस्कर हा युवक त्याच्यासोबत एका मित्राला घेऊन बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारोतीच्या दर्शनाला गेला होता. दर्शन घेऊन दुचाकीने घरी परत येत असतांना हरताळा फाट्याजवळ एका बैलगाडीला त्यांची दुचाकी धडकली, यावेळी खाली पडून तो जखमी झाला. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तुषारसोबत असलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे. मृत तुषारच्या पश्चात एक भाऊ असून, त्याच्या आई, वडीलांचे निधन झाले आहे. दोघे भाऊ आजीजवळ राहत होते.

तुषार एका कंपनीत नोकरीला होता. शनिवारी सकाळी घरून आजीला शिरसाळ्याला जात असल्याचे सांगून गेलेल्या तुषार बाविस्करच्या अपघाती निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.