एनसीसीच्या भरतीसाठी आलेल्या तरुणाचा धावताना मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । एनसीसीसाठी मैदानी चाचणी सुरु असतांना चक्कर येऊन पडल्याने १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि.२७ रोजी चाळीसगाव येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कैलास वासूदेव राठोड (वय-१८, रा.शिंदी, ता. चाळीसगाव) हा तरूण चाळीसगाव शहरातील कोतकर महाविद्यालयात एनसीसीच्या भरतीसाठी आला होता. मैदानी चाचणी दरम्यान धावत असतांना त्याला अचानक चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. बुधवार दि.२७ रोजी दुपारी ही उघडकीस आली आहे. कैलास राठोड याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे नेण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज