fbpx

आईची भेट घेतली..अन हीच भेट शेवटची ठरली ; वरखेडे येथील तरुण ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । उर्दरनिर्वाहासाठी धुळ्यात वास्तव्यास असलेल्या वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील ३५ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यु झाला. चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील मोहाडी गावाजवळ ही घटना घडली. विजय बळीराम शिरसाठ असे मृत तरुणाचे नाव आहे. सकाळीसच तो धुळ्याहून आईला भेटण्यासाठी व रेशनवर आलेले धान्य घेण्यासाठी वरखेडे येथे आला होता. मात्र त्याची ही भेट शेवटची ठरली.

विजय हा तरुण धुळे येथे कुटुंबासह राहत होता. वरखेडे येथे घरी वृद्ध आई एकटी राहत होती. आईला भेटण्यासाठी व रेशनवर आलेले धान्य घेण्यासाठी शनिवारी सकाळी ७ वाजता विजय वरखेडे गावी आला. आईची भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस करुन रेशनचे धान्य घेऊन तो सकाळी १० वाजता आपल्या दुचाकीने धुळ्याकडे परतीच्या प्रवासाला निघाला. मोहाडीजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने विजयचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यावर वरखेडे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

mi advt

पितृछत्र हरपले

मृत विजय शिरसाठ याची घरची परिस्थिती गरिबीची होती. धुळ्यात तो मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होता. मात्र त्याच्या अपघाती मृत्युने कुटुंबाचा आधारच गमावला असुन कुटूंब उघड्यावर पडले आहे. सकाळी धुळ्याहून वरखेडेला जातांना पत्नीला पतीची व त्यानंतर वरखेडेहून धुळ्याला जातांना आईला मुलाची शेवटची भेट होईल, असे वाटले नव्हते. काही वेळातच त्याच्या मृत्युची बातमी येवून धडकली. विजयचा मृतदेह पाहून त्याच्या पत्नीने व वृद्ध मातेने आक्राेश केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज