fbpx

चक्कर येवून पडल्याने एका तरूणाचा मृत्यू

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । चक्कर येवून पडल्याने एका तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी यावल तालुक्यातील अंजाळे गाव शिवारातील तापी नदीच्या काठावर घडलीय. विकास भागवत सपकाळे (वय ४०वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, विकास सपकाळे आज सकाळी अंजाळे शिवारातील तापी नदीच्या काठावर असलेल्या मारोती मंदीराकडे गेला होता. यावेळी त्याला अचानक चक्कर येवू लागल्याने तो खाली पडला. त्यास बेशुद्ध अवस्थेत प्रथम उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास तात्काळ भुसावळहुन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी विकास सपकाळे यास मृत घोषीत केले.

यासंदर्भातील मयताचे वडील भागवत नामदेव सपकाळे (वय६७ वर्ष) यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक प्रल्हाद जवरे हे करीत आहे. दरम्यान मयत विकास सपकाळे या तरुणाचे चक्कर येवुन पडल्याने मृत्यु झाल्याने त्यास सर्पदंश झाले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले, तरूण शेतकऱ्याचा अशा प्रकारे मृत्यु झाल्याने अंजाळे परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज