⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | महावितरणच्या अत्तीउच्च टॉवरवर चढून तरुणाने घेतला गळफास ; रावेरातील धक्कादायक घटना

महावितरणच्या अत्तीउच्च टॉवरवर चढून तरुणाने घेतला गळफास ; रावेरातील धक्कादायक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२४ । एक २५ वर्षीय परप्रांतीय तरुणाने महावितरणच्या टॉवरवर थेट ५० फूट उंच चढून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील विवरे येथील खिर्डी रोडवरील विवरे शेत शिवारात उघडकीस आलीय. ब्रिजेश कुमार काटकु बायगा (वय २५ रा. भरतपुर, जिल्हा कोरिया, छतीसगढ) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. याबाबत निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, ब्रिजेशकुमार हा तालुक्यातील विवरे खिर्डी रस्त्यावरील संतोष देवचंद तेली यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या पावरग्रिटच्या अत्तीउच्च विद्युत क्षमतेच्या मोठ्या टावरवर सुमारे ५० फुटवरती चढला. कापडच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. त्याची पँटमधुन पॅन कार्ड आढळून आल्याने त्यावरून पोलीस प्रशासनाने त्याचे नातेवाईकांशी संपर्क केला. त्यावरून त्याची ओळख पटली.

ब्रिजेश याला पावर ग्रिटच्या अकोला पथकाच्या सहकार्यने खाली उतरविण्यात आले असुन रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. निंभोरा पोलीस स्टेशनला पोलीस पाटील रितेश चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील हे करीत आहे. दरम्यान, मयत ब्रिजेश कुमार काटकु बायगा रावेर तालुक्यात नेमका कशासाठी आला होता हे समजू शकले नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.