डिझेल घेऊन येणारा दुचाकीस्वार तरुण अपघातात ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । धरणगाव येथून जवळ असलेल्या बांभोरी येथून डिझेल घेवून घरी जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. योगेश मराठे (वय-१९) रा.बोरगाव ता. धरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील योगेश मराठे हा तरूण दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीयू.५३७९ ने गावापासून जवळ असलेल्या बांभोरी येथे डिझेल घेण्यासाठी आला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास डिझेल घेवून परत गावाकडे जात असतांना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत योगेश मराठे हा जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके, गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार, विनोद संदाशिव, विजय धनगर, खुशाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे.

हेही वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -