उंबरखेड येथील महिलेची रिक्षातच झाली प्रसूती

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । प्रसूती वेदना होत असल्याने चाळीसगाव येथे रुग्णालयात नेत असताना उंबरखेड (ता.कन्नड) येथील एका महिलेची रिक्षातच प्रसूती झाली. दरम्यान, महिला व तिच्या बाळाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बाळ व माता दोघेही सुखरूप आहेत.

उंबरखेड (ता.कन्नड) येथील वनिता चव्हाण यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने पती हुकूमचंद चव्हाण यांनी त्यांना दुचाकीवरून लाेणजे येथे आणले. तेथून रांजणगाव आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यासाठी रिक्षाने आणले. प्रसूती वेदना तीव्र हाेत असल्याने येथील आराेग्य केंद्रातील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना आवाज दिला. मात्र या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांना चाळीसगाव येथे नेत असताना घाट राेडवरील पाेलिस चाैकीजवळ या महिलेने रिक्षातच मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर त्यांना तत्काळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळ व माता दाेघे सुखरूप आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज