एरंडोल येथे एक गाव एक गणपती !

बातमी शेअर करा

 जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२१ ।   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती या संकल्पनेंतर्गत श्री गणरायाची स्थापना रा.ती. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी करण्यात आली. नगराध्यक्ष रमेश परदेशी व नगरसेवक मनोज पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी ,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव ,सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, किशोर काळकर,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन ,रवींद्र महाजन जगदीश ठाकुर ,विजय महाजन ,गजानन पाटील राजेंद्र महाजन ,अतुल महाजन,परेश बिर्ला,प्रशांत पाटील,शालिक नगरपालिकेचे हितेश जोगी,अनिल महाजन,नगरसेविका आरती महाजन,आशा परदेशी आदी उपस्थित होते.
दरम्यान परंपरेनुसार शहरातील अठरा सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना अत्यंत साध्या पद्धतीने केली.तसेच घरोघर श्रींच्या लहान प्रतिमांची स्थापना करण्यात आली. यावेळी चिमुरड्यांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसून आले. यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली होती तर मुख्य रस्ता व मारवाडी गल्लीत गणेश मूर्ती व पुजेचे साहित्य खरेदी करणाऱ्यांची झुंबड उडाली होती. यावेळी शहरात ठिकाणी चोख बंदोबस्त होता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -