अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दहा मिनिटांत दुचाकी लंपास

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । शहरातील निशांत अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एका चोरट्याने बनावट चावीचा वापर करून माेटारसायकल चोरी केल्याची घटना ३ रोजी रात्री ७.४३ ते ७.५३ या दहा मिनिटात ही घटना घडली. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला असून, या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

कैलास रमेश चौधरी (वय ३६) यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची ही दुचाकी आहे. जीन्स पॅन्ट व पॉश टी शर्ट घातलेला व अवघे २० ते २२ वर्षे वय असलेला हा चोरटा सुरुवातीला पार्किंगमध्ये आला. आत येताच त्याने चौधरी यांच्या माेटारसायकलजवळ उभे राहून हॅण्डल लॉकची तपासणी केली. माेटारसायकलचे हॅण्डल लॉक असल्यामुळे काही सेकंद विचार करीत तो तेथेच उभा होता. नंतर तो पार्किंगच्या बाहेर निघून गेला. नऊ मिनिटांनंतर तो बनावट चावी घेऊन परत आला. या चावीने एक सेकंदात हॅण्डल लॉक व स्वीच सुरू केले. किक मारून तो माेटारसायकल घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर चौधरी यांनी पार्किंगमधले सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता चोरटा चित्रित झाल्याचे दिसून आले आहे.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद साळी तपास करीत आहेत. चौधरी यांनी पोलिसांना फुटेज दिले असून, त्या आधारावर तपास सुरू केला आहे. या चोरट्याचा एक साथीदार पार्किंगच्या बाहेर उभा असून, दोघांनी संगनमत करून दुचाकी चोरी केली आहे.

नाल्याजवळील दुचाकी लंपास

हातेड नाल्याजवळ उभी केलेली दुचाकी ३१ डिसेंबर रोजी रात्री ७ ते १० वाजेच्या दरम्यान चोरीस गेली. छगन भालेराव (वय ५१, रा. हरिओमनगर) यांच्या मालकीची ही दुचाकी (एमएच-१९, एक्यू-२९५४) आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश चिंचोरे तपास करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -